image24

Journey called Poems

Journey called Poems Journey called Poems Journey called Poems

Just glimpses of first few poems ....refinement needed

चमक

अवतरीत त्रिमूर्ती

अवतरीत त्रिमूर्ती

 

कधी अंधाराने ग्रासले

कधी उजेडाने फेकले

कधी ढगांनी झाकले

पण का मिणमिण करन मी सोडले

गेलो कितीही दूर  ध्रुव बनुनी

वा आलो लवकर जवळी शुक्र बनुनी

चमक कधी  नाही  फिकी पडली

अमावस्येला ही साथ नाही सोडली

जरी उजळले टपोर चांदण

 पूर्णिमा दिशी

शुक्ला तूनी कृष्णा त जाताना

 माझेच रूप दीसी

करतो प्रेम सदा बनून

बाल पणाच ट्विंकल ट्विंकल

मोठे होऊनी स्थिती माझीच 

ठरविते तुझे कुशल मंगल

जरी ना तेज माझे सूर्या परी

आहेतरी मला स्वयं प्रकाशित स्फूर्ती

निखळलो  ब्रह्मांडातून जरी

करतो द्विगुणित इच्छापूर्ती 

.........

गजानन.

अवतरीत त्रिमूर्ती

अवतरीत त्रिमूर्ती

अवतरीत त्रिमूर्ती

 डॉक्टरांवर  हल्ले ,पोलिसांना शिव्या

कर्जाने मरत होता शेतकरी अन्नदाता

भान असूदे कालचक्राचे माणसा

तुमच्या जिवासाठी तेच करतात आटापिटा

खाकी उभी भर मे महिन्याच्या उन्हात

बळीराजा ओला चिंबचिंब रे घामात

तुमच्या मृत्यू ला धोबी पछाडत 

अहोरात्र डाॅक्टर ईमरजन्सी कक्षात

बंद झाली साऱ्या प्राथर्ना स्थळांचे दार

वेळ आलीं आहे भावना स्वतःच्या तू सावर

ओळख पृथ्वी वर अवतरीत त्रिमूर्ती देवदूतांची पावर

लढूदया ह्या तिन्ही योद्धांना 

महामारीचा हा अतीकठीण लढा

न करता काही तुम्ही फक्त घरी बसून कपडे सांभाळा

करा आता एवढेच उपकार

बाहेर निघून नको धरणीला भार

हाच आहे शेवटचा वार

करण्या राक्षसी करोनाची हार

दिवस नाही ह्या घरवासाचे अजून फार

जुळतील पुन्हा आपल्या सर्वाचे तार

नका करु त्यांच्या समर्पन कार्यशस्त्राची बोथट धार

देशाने जरी जिंकून शमविला चीनी दंश

असूदे लक्षात चिरकाल नको स्मृतीभ्रंश

माणूसकीचा आहे सदैव त्यांच्यात अंश

टाळ्या वाजवून देतो माझ्या डाॅक्टर पोलिस शेतकरी मित्रांना हा कवितेचा मंच

वडील..आमचे दादा

अवतरीत त्रिमूर्ती

वडील..आमचे दादा

 जो सर्वात जास्त कसतो परिवारासाठी कम्बर

अदृश्य प्रेम त्याचे एवढे जिथं धरतीला मिळते अम्बर

तरीही येतो उदो उदो वा कविता करतांना त्यांचाच  शेवटचा नंबर

आईची नुसती माया पण नेहमी माझ्या श्रीराम दादांचा धीर

स्वभाव वडिलांचा असला थोडा गंभीर 

तरी प्रत्येक संकटात  राहतात हसत खेळत खंबीर

मुर्ती आहे थोडी लहान

शूद्र माझी प्रगती जर नसते त्यांचे कार्य महान

ठेवून शेतीबापाची  सर्व गहाण,

भागवली कर्ज काढून कुटुंबाच्या शिक्षणाची तहान

सहाही बिघे शेती विकून कुटुंबासाठी दाखवली हिम्मत

करून वडिलोपर्जित सर्वस्व अर्पण 

मोजली मोठी त्यांनी आम्हासाठी किंमत.

मग दोघं आम्ही भावांनी चांगलं शिकून, नोकरीला लागून केली इच्छापूर्ती

गावोगावी वाढवली वडिलांची कीर्ती 

 फक्त सातबारा वर नाव असावे म्हणून घेतली त्यापेक्षा भारी शेती

दादा आयुष्यभर तुम्ही केली दुःखांवर मात

कधी ना क्षणभर टाकली कात

देव राहु दे त्यांची आम्हा शंभरी साथ

प्रत्येक जन्मी मिळो तुम्हीच आम्हा तात

.......................गजानन

वावर

पुन्हा रावण मेला

वडील..आमचे दादा

 लवकरच निघून गेले हे

साडेतीन पैकी दोन मुहूर्त

नशिबानेच थांबविले आता

करण्या रेस्टॉरंट सेवेत सुपूर्द

गुढपाडव्या ला बांधली तोरणं

अक्षयतृतीयेला भरली घागर

नोकरी धंदा सर्वच बंद

वाटले बरे आहे आपले वावर

राहायला आहेत सर्वांकडे आता

उंच च्या उंच टॉवर

चोवीस तास असून पावर

नाही लागत झोप जशी खाटेवर ओढून झावर

अनुभवली आहे मी

भर उन्हात आंब्याच्याखाली ढेकळाची ती ऊशी

कूस ही नाही बदलणार असली

साखर झोप  देते कृषी 

घेतली घरे घेतला प्लॉट 

केल्या इनवेस्टमेंट डावलून शेती

डेड नाही हो.. ती संकट काळात 

सर्वांनचे पोटं तिनेच भरती

पूर्वजांना होती खरंच दुरदृष्टी

जगभर फिरून आलास जरी

काॅन्क्रिट च्या जंगलातएकच होते पुष्टी 

शेतीनेच सदा बहरते ही सृष्टी

....................... गजानन

वाईट नाही घाणा

पुन्हा रावण मेला

पुन्हा रावण मेला

 

 बाहेर यांचा मोठा बाणा !!

घरात नाही टाकत कोणी दाना

पाहिजे रोज रोज जर खाना

वाईट नाही की हो घाणा...

एकण्या पेक्षा त्यांचा ताना!!!

फरमाईश तुमच्या रोजच ना ना

तरी नाही करत डोळा काना

वाईट नाही की हो घाणा...

समजण्या पेक्षा स्वतःला शहाणा

नेहमीच असतो आपला बहाणा

कधी पार्टीचा तर कधी मित्रांचा

वाईट नाही की हो घाणा...

करण्यापेक्षा उगाच आगाऊ पणा

नेहमीच झिजवल्या तिने वहाणा

बनून स्वतः कुटूंबाचा कणा

घराला दिला तिनेच घरपणा

वाईट नाही की हो घाणा...

फक्त तिच्या  उपकाऱ्याचा परतफेडी साठी....

काही दिवस का होई ना....

....गजानन

पुन्हा रावण मेला

पुन्हा रावण मेला

पुन्हा रावण मेला

 

आज पुन्हा रावण मेला

लावून कपाळी धेला

मती चा सर्व अहंकार

परत मातीत गेला

रामाचा सर्वत्र जय जय

असत्य वर सत्याचा विजय

असुर रुपी अवगुणांचा

लिखित आहेच पराजय

जरी जानकी ने सोडला सुटकेचा निःश्वास

नाही सरला अजून वनवास

देवाला ही पुढे जाऊन पहा

" *लोक काय म्हणतील* "  चा त्रास

बरेच सुजन नेहमी कोसता

का देवा मलाच दुःख अन  शिक्षा

अरे मानवा....पवित्र सीतेला ही

चुकली का  अग्निपरीक्षा 

महान वाल्मिकी वा महर्षी व्यास

त्यांच्या ग्रंथातून एकच ध्यास

अंहकाराने नको सत्य अन् धर्म ह्रास

वर्तितो गजानन हाची अभ्यास .

पाॅझीटीव्ह

Just for Practice

पाॅझीटीव्ह

 

म्हारो आजोबा नेहमी म्हणे

चांगलु बोलो..चांगलुच व्हस

तिनेच आता सर्वाजन

बहुतेक " पाॅझीटीव्ह" म्हणतस

कितलु बी आवुद अपयश खुद्द

तु सोडजो नको तारी जिद्द

स्वतानं करनू पडीन तुन सिद्ध

असूच संकटासन तोंड देतस

बहुतेक तिनच "पाॅझीटीव्ह" म्हणतस

नको करजो तु वाईट विचार

सगळाससे सद् व्यवहार

हाईच लईन तारी नैय्या पार

ह्यच मंत्र कानमा घुमतस

बहुतेक तिनच " पाॅझीटीव्ह" म्हणतस

नेहमीच  सद् वर्तन अन्  आचार

नको डोकामा कोनो द्वेष नो भार

हेच दिधे तिसन  खरो सुविचार

हे जिन्ह नेहमीच याद रहतस

बहुतेक तिनच " पाॅझीटीव्ह" म्हणतस

ईतलू सांगिसन बी ज्या 

स्वतः न कही तरी समजतस

घर बसानूसोडी  बहीर शिलगतस

ह्या बुद्धीभ्रष्ट निगेटिव्ह लोकसन

बहुतेक करोना " पाॅझीटीव्ह" म्हणतस

बायको

Just for Practice

पाॅझीटीव्ह

 

उलटुन गेला आता एक महिना

काही केल्या ना थांवे करोना

लोकडाऊन ही संपेना 

काही केळ्या वेळ न दिवस जाईना

आता बायको म्हणते ऐकाना

झालाय करून अनेक कविता

माझ्या वर पण एक कराना

मस्त छोटीसी एक रचना

मी म्हणालो अग माझी राणी,

प्रत्येक क्षणी तूच असते माझ्या वाणी

नसेल तुझ्या ध्यानी मनी 

पण ऐकत राहतो तूझीच गाणी

तूच माझी कहाणी तूच कविता

आहे राम तुझा, तूच माझी सीता

सजवण्यासाठी माझे घरमंदिर

दिल्याचं तु समस्त विटा

का करतेस एवढी काळजी

जणू सात  जन्मांची ही पळजी

फेडता फेडता ही दररोज

भरू शकेल का उपकाराची ही खळगी

कधी बनते आई कधी भाऊ न बहीण

तुझ्या शिवाय कोन आहे सच्ची मैत्रीण

मुलांसाठी ही करते दिवसभर जीवाचे रान 

सायंकाळी सोडून सगळा त्राण, विसरते भान

प्रेमाचं,त्यागाचे बहरू दे  गुंफण

हेवा वाटावं असे जगू आपण जीवन

लिहितोय आता  भिता भिता,

करणार का तुला अलांकारीत

फक्त शब्दसुमनांची ही कविता.

Just for Practice

Just for Practice

Just for Practice

 

बाहेर ना दिसणार तुम्हा रंभा
ना मिळणार कोणता खंबा

उगाच का हो हिंडा

खावया पोलिस दादाचा दंडा!!!

सर्वांचा झालाय वांदा

 घाबरतो खायला तिखट

ना मिळतोय गोड आंबा

वरून ती म्हन्ते तुम्हीच रांधा

मित्रांना ही सांगा

बस ,आहे तिथेच थांबा

नाहीतर रौद्ररूप धारण करेन

घरातली जगदंबा

वरिष आलंय असं भयानक

घडलय सारे अचानक

वेळ नाही म्हणून भाव खाणारा कांदा

म्हणतोय कसा घरातच सौख्यभरे नांदा.

.......... गजानन

 जरी झालाय आता सूर्यास्त

करोनाच्या अंधारात होणार कष्ट

पण तुम्ही घरातच रहा मस्त

तरच होणार तो नष्ट

आता जीवन झाले स्वस्त

देशाची अर्थव्यवस्था ध्वस्त

नका निघू बाहेर होऊन त्रस्त

तो बकासुर करील फस्त

बाळगू नका कसले भय

फक्त आनंदी असू द्या तुमचे हृदय

 प्रार्थना माझी व्हावे जग निरामय

कारण उद्या पुन्हा होणार सूर्योदय !!!

विव्हळलेला भक्त

फोटो पुण्य धर्माचे

Just for Practice

 

कुणी म्हणतं अफवा फक्त

कुणी म्हणत कायदा सख्त

मग काहो सांडले गेले

निरपराधाचे रक्त

जीवन झालेय स्वस्त

माणूसकी ही झाली ध्वस्त

काय   ते हृदयाचे कष्ट

बघून विव्हळलेला भक्त

चॅनलं चा टी आर पी मस्त

राजकारणी ही त्यात व्यस्त

कोण सत्य अन् कोण भ्रष्ट

पाहुनी जनता त्रस्त

मेले बिचारे जिवनभर करुन भक्ती

आता काय फायदा सोडून हि गुत्थी

इथेच भरावे लागेल राक्षसांनो

जर बदलली नाही ही अमानुष वृत्ती

साश्रुनयनांनी 😢.... गजानन

फोटो पुण्य धर्माचे

फोटो पुण्य धर्माचे

फोटो पुण्य धर्माचे

 

कुणी म्हणत सेवेचे फोटो नको काढू

उगाच त्यांना सोशल मीडिया वर धाडू

अहो उपदेशकर्त्यांनो तुम्हा आम्हा घर बसल्या कशे हे कळणार

निदान त्या फोटोतल्या एकाचे  तरी पोट भरणार

देताना नको गर्व पण असावा अभिमान

गरीब कल्याणचे कार्य हे अगदी आहे छान

कशाला वाटेल घेणाऱ्याला फोटोंची लाज

ओंजळ भरुन का होईना दान भागवतोय त्यांचा आज

गरिबांन बरोबर श्रीमंत ही  देताय सर्व लढा

अमाप पैसा असूनही काय उपयोग, घेतलाय त्यांनी धडा

काढ बाबा फोटो पुण्य धर्माचे

त्याने थोडीच जातो माणूसकी  ला तडा

नाही म्हणत मी लोकासांगे ब्रम्हज्ञान

अन् स्वतः कोरडे पाषाण

ना उघडीतो तुझे कान

तूही टाक ना एखादा फोटो

देताना तूझ्या हिश्याचे वाण

प्रसंग आला आहे हा बाका

चोहिकडून ऐका त्या हाका

बनून आता तुही कृष्ण सारखा  सखा

गरीब सुदामाच्या झोळीत फोटोंसह का होईना मुरमुरे टाका

...................गजानन

हैद्राबाद चा सिंघम

फोटो पुण्य धर्माचे

फोटो पुण्य धर्माचे

 

नाही आठवत कुणाला हैद्राबाद चा रेप 

कारण मिडीयात चालली फक्त निर्भयाची टेप

नाही झाली फाशी नाही त्यांना जन्मठेप

ना कैंडल मार्च ना आई वडिलांची 

न्यायालयात पायपीट ना खेप

होती सर्पां साठी जणू ती गरुडझेप

दिली  पोलिसांनी देशाला एक भेट

न करता फालतूची कागदपत्रे वेट

नेऊन दुष्कर्मा च्या जागेवर थेट

गोळ्या घालून नराधमांचा केला शेवट

खाकितला पुन्हा दिसला हा बाणा   भक्कम

अनुकरला त्यांनी सिम्बा आणि सिंघम

मिळू द्या दोष्यांना हेच मरण

मग नाही करणार स्त्री अब्रूचे सीमोल्लंघन

ना लागो फाशी देण्यात वर्षे सात

ना पडो कोणती फाईल धूळ खात

कधी ना पहावी लागे न्यायाची वाट

तेव्हाच हटेल क्रुरतेची काळोखी रात

असु द्या आपल्या संस्कृतीची जाण

रावणाला हि राखावी लागली पवित्रतेची शान


 ..................गजानन 

poems